Showing posts with label Tuhi Bhijun Ja. Show all posts
Showing posts with label Tuhi Bhijun Ja. Show all posts

तुही भिजुन जा

भिजल्या या रात्रि सखे तुही भिजुन जा
बहरल्या बागेत या तुही रुजून जा

साद घालितो कुणा मंद मंद वारा
वळूनि केला कुणी धुंद धुंद इशारा
आभाळ होऊंन सखे तुही गर्जुन जा

तू जवळी येता तृप्तिला गे काय उणे
सुने जाऊँन सारे उरेल मत्त जीणे
नटली गं चिंब धरा तुही सजुन जा

वाट किती पहावी अमृत झरण्यासाठी
मिटून डोळे तुझ्या बाहुत मरण्यासाठी
बाहुत माझ्या पेटून तुही विझून जा