तुही भिजुन जा

भिजल्या या रात्रि सखे तुही भिजुन जा
बहरल्या बागेत या तुही रुजून जा

साद घालितो कुणा मंद मंद वारा
वळूनि केला कुणी धुंद धुंद इशारा
आभाळ होऊंन सखे तुही गर्जुन जा

तू जवळी येता तृप्तिला गे काय उणे
सुने जाऊँन सारे उरेल मत्त जीणे
नटली गं चिंब धरा तुही सजुन जा

वाट किती पहावी अमृत झरण्यासाठी
मिटून डोळे तुझ्या बाहुत मरण्यासाठी
बाहुत माझ्या पेटून तुही विझून जा

ठेव तू विश्वास प्रिये

ठेव तू विश्वास प्रिये
हातात माझ्या हात दे
ओळखीचा एक शब्द
मला तुझ्या शहरात दे

चंद्र तारे सूर्य
फिरवती पाठ जरी
अंधार हा उजलन्या,
एक तेवती ज्योत दे

धो धो पाउस कोसळतो
छप्पर न उरले शिरी
चिम्ब होऊंन गाण्यासाठी
एक प्रितीचे गीत दे

भोगले खुप आयुष्य
साहिले खुप घावही
मज तुझ्या बाहुत सखे
या जीवनाचा अंत दे

तू ग़ दूरच्या देशात

आला आला श्रावण
अंगणी वसंत फुलला
भेटिलागी तुझ्या सखे
जीव हा आसावला

ओल्याचिम्ब चांदण्यात
सोनेरी रात्र सजते
तुझ्या स्मृतिने सखे
हळूच पापणी भिजते

गारठलेल्या देहास माझ्या
तुझी रेशमी ऊब हवी
आकारलेली प्रीत गीते
ह्या सप्त रंगात न्हावी

नटतो वसंत हा
रोज विविध वेषात
पण कसे हे दुर्दैव सखे
तू ग़ दूरच्या देशात.

प्रिये तुझा नकार नाही

गार वारा ओला ओला
हे आकाश
तू जवळी नसताना गं
तुझ्या असण्याचा भास

प्रत्येक थेंब पावसाचा
शिंपीत आहे अत्तरदाणी
सारी नशा दैवाने
बहाल केलि तुझ्या नयनी

तुझ्या शिवाय प्रिये
ही सारी नशा गौण आहे
गीत माझ्या कन्ठातले
एवढ्याचसाथी मौन आहे

वाटते सांगुन टाकावे
मनात माझ्या दाटलेले
चुंबुन घ्यावे अमृत
ओठात तुझ्या साठलेले

सर्व आहे मंद धुंद
पण प्रिये तुझा होकार नाही
सोडला असता विचार तुझा
पण प्रिये,
तुझा नकार नाही.

भाव मनीचे माझ्या

भाव मनीचे माझ्या शब्दात मांडू कसे
प्रेम तुजवर करतो तुजला हे सांगू कसे
दुजांसारखे मला बोलता न ये
प्रेम करावे कसे तूच सांग मज प्रिये